Ad will apear here
Next
उंच माझा झोका
यशस्वी स्त्रीची कहाणी हे वेगवेगळ्या घटनांचे मिश्रण असते. म्हणूनच त्यांचे कार्य हे प्रेरणादायी ठरते. विविध क्षेत्रांत भरारी मारणाऱ्या सहा स्त्री व्यक्तिमत्त्वांची ओळख सुहास क्षीरसागर यांनी ‘उंच माझा झोका’मधून करून दिली आहे.

‘कॅमल इंक’, कॅमलिन कंपास, रंगीत खडू, जलरंग अशा उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या दांडेकर कुटुंबातील रजनी सुभाष दांडेकर यांचा यशस्वी उद्योजिकापर्यंतचा प्रवास येथे दिला आहे. रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील आदरणीय कलाकार सुहास जोशी, तसेच चित्रपटसृष्टीतील व्यक्ती व त्या संबंधीच्या लेखनाची वेगळी वाट धरलेल्या नाट्य व चित्रपट समीक्षक ललिता ताम्हाणे, आपल्या अलौकिक व गोड आवाजाने श्रोत्यांचे कान तृप्त करणाऱ्या आशा खाडिलकर या कलाकारांची कहाणीही यातून समजते. प्राण्यांचे मानसशास्त्र जाणणाऱ्या डॉ. विनया जंगले यांचे प्राण्यांशी जडलेले अद्भुत नाते यातून उलगडले आहे. प्रामाणिकपणा, सचोटी, शिस्त, कामाची आवड या गुणवैशिष्ठ्यांमुळे बँकिंग क्षेत्रात उत्तुंग स्थानी पोचलेल्या अनुराधा एकनाथ ठाकूर यांचा प्रवाशही यात रेखाटला आहे.  

पुस्तक : उंच माझा झोका
लेखक : सुहास क्षीरसागर
प्रकाशक : उद्वेली बुक्स
पाने : २००
किंमत : २६० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZVVBY
Similar Posts
मेनोपॉज मेनोपॉजचा काळ हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील अत्यंत नाजूक काळ असतो. या काळात स्त्रीच्या शरीरामध्ये जसे बदल होत असतात, तसेच तिच्या भावविश्वात. या काळाला सहजतेने सामोरे जाण्यासाठी काय करावे, याचे शास्त्रीय मार्गदर्शन स्त्रीरोगतज्ञ डॉ. आनंद शिंदे यांनी या पुस्तकातून केले आहे.
सुफळ संपूर्ण आज स्त्री विश्वात झालेली प्रगती लक्षणीय असली, तरी एक काळ असा होता, की स्त्रियांचे स्थान केवळ स्वयंपाकघरातच होते, तरीही त्यावेळच्या परिस्थितीतही स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या स्त्रिया होत्या. अशाच एका स्त्रीची कहाणी नेहा कुलकर्णी यांनी या छोटेखानी कादंबरीतून रेखाटली आहे.
टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन आर्थिक बाजारात पैसे कमविण्यासाठी चांगली संधी असते; मात्र अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे अपुरे ज्ञान असल्याने पैसे गमविण्यासाठी वेळ त्यांच्यावर येते. स्वतःची मेहनतीची कमाई अशा प्रकारे घालविण्याऐवजी योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे गुंतविण्यासाठी रवी पटेल यांनी ‘टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन’मधून

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language